कोरोणा व कुष्ठरोग बाबत स्वःनिगा स्वयं जागृतीची विशेष मोहीम.”
– सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा खास उपक्रम
नागभिड : कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे समुदायात राहणारे लाखो कुष्ठरुग्णांचे व त्यांच्या परिवाराच्या जीवनमानावर गंभीर परिणाम झाले आहे. या कोविड-19 काळात कुष्ठरुग्नांना अनगिनत आरोग्य विषयक व कौटुंबिक, सामाजिक, आर्थीक समस्यां/प्रश्न भेडसावले असुन समस्यांची शृखला अजूनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘सक्षम कुष्ठातेय स्वाभिमानी संस्था या कुष्टरुग्णाच्या संघटनेच्या वतीने व सासाकावा हेल्थ फाऊंडेशन (जापान) यांच्या सहकार्याने व अलर्ट इंडिया मुंबई च्या सौजन्याने कोरोना व कुष्ठरोग विषयी स्वःनिगा व स्वयं जागृतीची विशेष मोहिम चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सुरू केली आहे. या अनोख्या मोहिमेत काही कुष्ठांतेय स्वतः स्वयंसेवक म्हणून घरोघरी जाऊन कोरोना बाबत विशेषतः लसीकरण करून घेण्याबाबत योग्य माहिती देऊन जनजागृती करीत आहेत. तसेच कुष्ठरोग विषयी शास्त्रीय माहिती देऊन विकृती प्रतिबंधासाठी स्वःनिगा कशी घ्यावी हे प्रात्यक्षिकासह सांगत आहेत. कुष्ठरुग्नानी आत्मनिर्भर स्वावलंबी होने ही काळाची गरज ओळखून संस्थेने गरजूना स्वयं रोजगारासाठी आर्थिक मदत सुद्धा दिली आहे. स्वतः निगा जागृती शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. घरच्या घरी विशेष जल-तेल नीती यासारखे उपाय करून कुष्ठरोग विकृती टाळल्या जाऊ शकतात असा आत्मविश्वास कुष्ठरुग्न व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मध्ये निर्माण करण्याचे मौलिक कार्य संस्थेच्या वतीने सुरू आहे. संस्थेच्या अश्या कार्याची दखल नुकतीच जागतिक स्तरावर घेतली जात आहे.

कोरोणा व कुष्ठरोग बाबत स्वःनिगा स्वयं जागृतीची विशेष मोहीम.” – सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा खास उपक्रम
Advertisements
Advertisements
Advertisements