Breaking News

डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय– रोटे. हिरालाल बघेले

डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय– रोटे. हिरालाल बघेले

वरोरा : संपूर्ण विश्र्व कोरोना सारख्या महामारीला झुंज देत आहे. या काळात डॉक्टर्स समाज आणि देशाच्या सेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र अविरतपणे कार्यरत आहे. वर्षानुवर्षे देवदूताच्या भूमिकेतून जनतेची सेवा बजावणाऱ्या डॉक्टर्संच्या ऋणातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांनी केले. रोटरी क्लब ऑफ वरोरा रोटरी डिस्ट्रिक ३०३० चे २०२१-२२ ची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नवीन कार्यकारिणी तर्फे स्थानीय उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त कोव्हीड – १९ च्या जागतिक महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत वरोरा शहरातील नागरिकांच्या स्वास्थ्याचं रक्षण करणाऱ्या शहरातील जिगरबाज डॉक्टर्सना ‘ कोरोना योद्धा सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंकुश राठोड हे होते. व्यासपीठावर डॉ.सागर वझे, डॉ.विवेक तेला. रोटरी क्लब ऑफ वरोरा सचिव बंडू देऊळकर डॉ. निखिल लांबट प्रामुख्याने उपस्थित होते.
रोट. बघेले पुढे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी क्रांतिकारी आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय या ध्येयवादी डॉक्टराच्या सन्मानार्थ १ जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. महान चिकित्सक भारतरत्न बिधान चंद्र रॉय यांचा सन्मान आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी केंद्र सरकारने १९९१ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
रोटे. बंडू देऊळकर म्हणाले की, डॉ. बिधान चंद्र रॉय यांची गणना देशातील महान चिकित्सकात केली जाते. त्यांचा जन्म १ जुलै १८८२ मध्ये झाला. त्यांना सन्मान आणि श्रद्धाजंली अर्पित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यांचा जन्मदिवस व पुण्यतिथी दोन्ही याच तारखेला येतात,असेही त्याने आवर्जून सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. अंकुश राठोड म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात डॉ.बिधान चंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. रोटरी क्लबच्या पुढाकारातून राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मंजूळकर, डॉ. रमेश जाजू, डॉ.निशी सैनानी, डॉ. प्रदीप पराते, डॉ. विजय चांडक,डॉ. संतोष मुळेवार, डॉ. हेमंत खापने, डॉ.सागर वझे, डॉ. विवेक तेला, डॉ. मीना पराते, डॉ. शोभा चांडक, डॉ. हेमलता खापने, डॉ. राजेंद्र ढवस, डॉ. राहुल धांडे, डॉ. विशाल हिवरकर, डॉ. अमोल हजारे, डॉ. जगदीश वैद्य, डॉ. मेहरदीप हटवार, डॉ. प्रवीण विश्वंभर , डॉ.शेख, डॉ.आशिष चवले आदींना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. सचिन जीवतोडे यांनी केले. सूत्रसंचालन रोटे. पराग पत्तीवार यांनी केले.तर आभार रोटे. नितेश जयस्वाल यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटे. समीर बारई, होजैफ अली, जितेंद्र मत्ते, विनोद नंदूरकर, अमित नाहर, अमित लाहोटी, राम लोया, विजय पावडे, धनंजय पिसाळ, योगेश डोंगरवार, आशिष ठाकरे, पवन बुजाडे, विशाल जाजू, दामोदर भासपाले, आयचित, अमोल मुथा,विनोद जानवे इ. ने योगदान दिले.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *