Breaking News

सुशी दाबगावाच्या मामा तलावात मगर , बघ्यांची गर्दी

Advertisements

सुशी दाबगावाच्या मामा तलावात मगर , बघ्यांची गर्दी

Advertisements

मूल,
मूल तालुक्यातील सुशी दाबगाव गावानजिक असलेल्या माजी मालगुजारी तलावात शुक्रवार, 2 जुलै रोजी 5 फुटाचा मगर सापडला असून, त्याला बघण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisements

सुशी गावातील मामा तलावात मच्छी पालन होत असून, येथील मासेमारी समाज नेहमीच मासे मारीत असतात व पावसाळा आला की मास्याची बिजाई सोडत असतात. शुक्रवारी सकाळी तलावातातील बिजाई काढण्यासाठी तलावात जाळे पसरवले, तर त्यांना मगर दिसून आला. काहींनी तर मोठे मासे असावे, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, काठाला येताच मगराची पुष्टी झाली आणि त्यास पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. हा मगर ताडोबा-अंधारी नदीतून आला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *