Breaking News

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही.

Advertisements
कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही.
भारत देश स्वतंत्र होऊन आज किती वर्षे झाले?. राज्यघटनेची अंमलबजावणी अजूनही जात धर्म पाहून होते असे एक नाही तर हजारो उदाहरण देता येईल.या देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणेत जातीयवादी अधिकारी आहेत.ती यंत्रणा राबविणारे अधिकारी योग्य वेळी जातीवादी भूमिका बजावतात.कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात.तेव्हा ते सर्व संस्कार,नीतिमत्ता आणि प्रशिक्षण घेताना दिलेले धडे विसरतात.या देशातील प्रिंट मीडिया व चॅनल मीडिया ही निःपक्षपाती निर्भीड नाही.तो ही जात धर्म पाहूनच भूमिका बजावतो.ते जागरूक पहारेदाराची भूमिका पार पाडत नाही. कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणारे रक्षक जेव्हा भक्षक बनतात.ते कायदेच मोडून खातात. बलात्कारी अन्याय गस्त पीडित मुलीचे महिलांचे नांव प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाले नाही पाहिजे असा एक कायदा आहे.तसे करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होते. पण मागासवर्गीय मुलगी महिला असेल तर तिच्या नांवाचा जातीचा धर्माचा उल्लेख नियमितपणे केला जातो.
दिल्लीच्या निर्भयाचं नाव माहीत आहे का ?.कोणाची मुलगी व कोणत्या जाती धर्माची होती तरी देशभरात तिच्या साठी कॅडल मार्च निघाले तिचा उल्लेख मात्र नियमितपणे दिल्ली ची निर्भया असाच होत होता.का?.कोपर्डीच्या पिडीतेचं नाव माहीत आहे का?. तिच्यासाठी मराठा समाजाने ५७ मोर्चे काढले त्यात एक प्रमुख मांगणी कोपर्डी हत्याकांड होती. नितीन आगेचे ज्या मुली बरोबर प्रेम होतं अशी शंका होती म्हणूनच नितीन आगेला शाळा कॉलेज मधून मारहाण करीत बाहेर काढले आणि हलाहल करून मारले.पण त्या मुलीचे नांव फोटो कधीच प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले नाही.कोणाची मुलगी व कोणत्या जाती धर्माची होती ती?. तरी तिचा कुठेही उल्लेख झाला. नाही ना ?. का नाही झाले?. जात धर्म आडवा आला नां?. बलात्कारीत मुलीचे नांव प्रसिद्ध करू नये ?.असा कायदा कलम आहे म्हणून जाहीर करायचं नसते अन ती अल्पवयीन असली तर अजिबात नाव उघड करायचं नसते हे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातच शिकवलं जाते. 
 मागासवर्गीय अल्पसंख्याक जाती धर्माचे मुली महिला असल्या तर त्यांच्या नांवाचा धर्माचा जास्तीतजास्त उल्लेख करावा म्हणूनच मागासवर्गीय समाजातील मुलीचे नावे सर्व प्रिंट चॅनल मीडियावर लिहली, बोलली आणि दाखविली जातात.यावरून या देशातील प्रशासकीय पोलीस यंत्रणा संविधानाने दिलेल्या चौकटीत वागत नाही तिची अंमलबजावणी करीत नाही.म्हणूनच फक्त विशिष्ट समाजाच्याच मुलींशी हा भेदभाव का ? कारण मुलगी आपल्या जातीची नाही हे त्यांना समजावं अन बाकीच्या लोकांनी कँडल मार्च, मोर्चे काढू नये म्हणून नां ? प्रशासकीय अधिकारी पोलीस, वकील, न्यायालय,पत्रकार, संपादक हे योग्य वेळी आपली जात दाखवतात व तिचे रक्षण आणि स्वरक्षण करतात.म्हणूनच ते जातीयवादी ठरतात.म्हणूनच हे सर्व कायद्याचे रक्षक नाही तर भक्षक ठारतात.
मंदिरात स्त्री गेली की धर्म बुडतो मग मंदिरात “बलात्कार” केल्यावर धर्म बुडत नाही का ?.मंदिरात बलात्कार होतात म्हणून मंदिरे बंद करण्याची मांगणी पत्रकार,संपादक का करीत नाही.किंवा तसे प्रश्न का विचारल्या जात नाही?.
देशातील अनेक राज्यात जात दांडगे,धन दांडगे खुलेआम मागासवर्गीय समाजातील लोकांचे खून करण्याची जाहीरपणे धमकी देऊन सामूहिकरीत्या हल्ले करून खून करतात तरी पोलीस फक्त अदाखल पात्र गुन्हा दाखल करून घेऊन आरोपीवर कोणती ही कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत.म्हणजेच ते जे पोलीस कायदा सुव्यवस्था देश सेवेचे प्रशिक्षण घेऊन आले ते सर्व जातीसाठी विसरतात. कर्तव्यदक्षता दाखविण्यास असमर्थ आहे.त्यामुळेच देशात कायद्या पेक्षा जात दांडगे दांडगे राजकीय गुंड निर्माण होत आहे.काही वर्षा नंतर ते सामुदाहिक नियोजन बद्ध हल्लाबोल करून पोलिसाचा बळी देण्यास मागेपुढे पाहत नाही.त्यामुळेच त्यांची हिंमत वाढविण्याचे काम पोलीस यंत्रणा करते आणि कायद्याचे रक्षक तेव्हा भक्षक बनतात.
एक माणूस म्हणून आपण कोणत्या धर्माचे व जातचे आहोत.आणि त्यावरील कोणत्या धर्माचे संस्कार झालेले आहेत.तो जिथे नोकरी करतो तेथील त्यांच्या वागणुकी वरून दिसुन येते.विशिष्ट जातीचे लोक आज एवढ्या खालच्या थराला जातील अस कधी वाटलं ही नव्हते.पण त्यांचा इतिहास भूगोल पाहिला तर ते या पेक्षाही क्रूर हिंसक विचारांचे होते.ते लपविण्या साठीच त्यांनी देव धर्माचा सहारा घेतला.जगात देव कधीच नव्हता असे अनेक ठिकाणी सिद्ध झाले आहे.कोणत्याही संकटात देव धाऊन येत नाही.असे ठामपणे सांगणाऱ्या आमच्या सारख्यांना देवा समोर, त्याच्याच मंदिरात बलात्कार होतात तेव्हा देव कुठं असतो? हाच प्रश्न विचारावा लिहासा वाटतो.
ज्या देशात स्त्रीला मासिक पाळी येते म्हणुन मंदिरात जाऊ दिले जात नाही.घरात सर्व वस्तूला हात लाऊ दिल्या जात नाही.त्याच देशात त्याच मंदिरात स्त्री वर बलात्कार केले जातात. बलात्कार करणारी ही नीच प्रवृत्ती असते तिला जात धर्म नसतो. हे मान्य केलेच पाहिजे. पण जेव्हा ब्राह्मण बलात्काऱ्यांच्या समर्थनात त्यांच्या धर्माचे लोक मोर्चे काढतात तेव्हा काय?. तेव्हा ते हे विसरतात की या देशात संविधान आहे मनुस्मृती नाही.लोक लगेच शिक्षा देणार नाहीत पण दोन चार सहा महिन्याने या कृत्याची शिक्षा होईलच अशाच आशेने अपेक्षेने भारतीय जनता जगात असते. खैरलांजी पासून कालच्या चितोड खामगाव व लातूरच्या हत्त्याकंडा पर्यंत घडत आहे ते विशिष्ट मराठा समाजाच्या लोकांना कडक शिका न झाल्यामुळे हा खेड्यापाड्यातील कुणबी मराठा मागासवर्गीय समाजाने गावात पक्के घर बांधकाम करणे आणि कुणबी पाटलाच्या शेत जवळचे शेत विकत घेणे सहन करू शकत नाही. सरकारी नोकरया मधील मागासवर्गीय समाजाचे आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपत असते. आता खेड्या गावातील घर आणि शेत पण सहन होत नाही. मनुवादी मानसिकता ठेवणाऱ्या न्याय व्यवस्था कडून न्याय लवकर मिळेल आणि त्या नराधमांना शिक्षा मिळेल अशीच या न्याय व्यवस्थे कडून अपेक्षा ठेवावी लागेल.
आठ वर्षाच्या चिमुकली वर ते मंदिरात.बलात्कार होताना 33 कोटी देवा पैकी एकाही देवाला तिचे रक्षण करण्यासाठी धावला नाही.त्यांना ही माहिती होती का?. की ही स्त्री जातीची मादी आहे म्हणून.
सरकारने किती संविधान नाकारले तरी त्यांची चौकट त्यांना मोडता येणार नाही.प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी किती ही बेईमान झाले तरी त्यांना संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट करता येणार नाही.भारतीय संविधान हे सर्व बारीक सारीक घटनेचा विचार करून तयार झाली आहे. मागासवर्गीय समाजाची  शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या जागृती ही ब्राम्हणा पेक्षा कुणबी मराठा समाजाला पाहली जात नाही.सहन होत नाही असे हे नाईलाजाने लिहावे लागते.अन्याय,अत्याचार हत्याकांड करणाऱ्या एका कुटुंबाच्या मागे संपूर्ण समाज ज्या पद्धतीने उभा राहतो त्याला लोकशाहीच्या मार्गाने लोकप्रतिनिधी निवडून दिला जातो तो ही त्यांच्या सोबत उभा राहून समान न्याय देण्या ऐवजी सामुदाहिक हल्ले करण्यासाठी शास्त्र पुरविण्याची भाषा करतो म्हणजेच त्याला भारतीय संविधानाने दिलेला कायदा सुव्यवस्था ठेवणाऱ्या पोलीस यंत्रणेची कोणती ही भिती वाटत नाही.कारण कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात. त्यामुळेच देशात अशी परिस्थती निर्माण होत राहणार आहे.त्याविरोधात प्रत्येक वेळी जनताच रस्त्यावर आल्या शिवाय राहत नाही. हे सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी व सरकारने लक्षात ठेवावे.म्हणूनच कायद्याच्या रक्षकांनी प्रत्येक वेळी जागृत राहून कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या आणि दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला मग ती कितीही मोठी असो त्याला वेळीच रोखण्याचे कर्तव्य पोलीस अधिकाऱ्यांनी केले पाहिजे.तर देशात समाजात कायदा सुव्यवस्था कायम ठेवता येईल.म्हणून कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९.भांडुप मुंबई
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मुंबईत दरड कोसळली, 165 कुटुंबांना धोका

मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरातील रामबाग सोसायटीमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या …

आंबेडकरी विचार मोर्चा प्रणित आंबेडकरी महिला मोर्चाच्या नवनियुक्त अध्यक्षांच्या सत्कार

मुंबई : आंबेडकरी, फुले,शाहू,संत रविदास यांच्या विचारांचा चळवळीला पुढे नेण्यासाठी महिलांच्या मोठया प्रमाणात योगदान आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *