लसीकरण मोहिमेत सर्वांनी सक्रियतेने सहभागी व्हावे-डॉ .मंगेश गुलवाडे
आय. एम. ए. चंद्रपूर कडून लसीकरणासाठी जनजागृती
चंद्रपूर – 1 जुलै ला राष्ट्रीय डॉक्टर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.इंडियन मेडिकल चंद्रपूरच्या वतीने विविध कार्यक्रम सेवा सप्ताह निमित्य आयोजित करण्यात आले त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे लसीकरण मोहिमेसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी चंद्रपूर आय .एम.ए च्या डॉक्टरांनी चंद्रपूर ते राजुरा व राजुरा ते चंद्रपूर असे 50 किमी चे अंतर सायकल ने पूर्ण करून लसीकरण मोहिमे संदर्भात जनजागृती केली त्यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी म्हटले की लस ही शंभर टक्के सुरक्षित असून नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगत सर्व नागरीकांनी या लसीकरण मोहिमेत सक्रीयतेने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले सदर जनजागृतीपर सायकल रॅलीत आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ.मंगेज गुलवाडे, सचिव डॉ.अनुप पालिवाल,सहसचिव डॉ. प्रीती चव्हाण,माजी सचिव डॉ.सुरभी मेहरा,डॉ.हर्ष मामीडवार, डॉ.ऋतुजा मुंधडा, ऋतेज गुलवाडे,यांनी सहभाग घेतला तसेच राजुरा येथे सायकल रॅलीचे स्वागत करून डॉक्टर डे साजरा करण्यात आला त्यावेळी डॉ. राजेश कतवारे,डॉ.मारोती पिंपळकर,डॉ.लहू कुळमेथे,डॉ.अशोक जाधव,डॉ.संदीप बांबोळे,डॉ.वैशाली कतवारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती……..