Breaking News

खुल्या कोळसा खाणींमधील वाढत्या चोऱ्या  व अफरातफरीवर आळा घालण्यास वेकोलि प्रबंधनाने ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करावी – हंसराज अहीर

Advertisements

खुल्या कोळसा खाणींमधील वाढत्या चोऱ्या  व अफरातफरीवर आळा घालण्यास
      वेकोलि प्रबंधनाने ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करावी – हंसराज अहीर

Advertisements

चंद्रपूरः- नागपूर वेकोलि मुख्यालया अंतर्गत बहुतांश ओपन कास्टच्या खाणीमध्ये खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असल्याने या कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील वाहनांची खाण परिसरात रात्रंदिवस ये-जा असल्याने संबंधीत कंत्राटदारांच्या अज्ञात कामगार कर्मचाऱ्यांकडुन चोरी, किमती मालाची अफरातफरी होत असल्याचे प्रकार उघडकीस आले असल्याने वेकोलीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या सर्व माईन्स क्षेत्रात तातडीने ड्रोन कॅमेराचा वापर करून हे अनुचित प्रकार थांबविण्यात यावेत अशी सुचना पूर्व केंद्रीय  गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कोल इंडीयाचे अध्यक्ष, वेकोलि मुख्यालयाचे अध्यक्ष तथा   प्रबंध निदेशक तसेच संबंधीत खाण क्षेत्रांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना  केली आहे.
सदर घटना व तक्रारींची गंभीरपणे दखल घेत हंसराज अहीर यांनी या संदर्भात वेकोलिच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना  पत्र पाठवून या अनुचित प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. विशेषतः नागपूर मुख्यालया अंतर्गत येणाऱ्या वेकोलि वणी नाॅर्थ, वणी, बल्लारपूर व उमरेड या क्षेत्रांमध्ये बाहेरील कंत्राटदारांच्या कामगार कर्मचाऱ्यांकडुन वेकोलिची अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केली जात असल्याच्या तक्रारी, बातम्या असतांना या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याबद्दल खेद व्यक्त करीत वेकोलिचे सुरक्षा कर्मचारी शेकडो एकरामध्ये पसरलेल्या या क्षेत्राची निगराणी करण्यास असमर्थ असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी ड्रोनचा वापर हेच प्रभावी माध्यम  आहे असेही अहीर यांनी संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.
खासगी कंत्राटदारांच्या अंमलाखाली असलेल्या या क्षेत्रात अज्ञात वाहने तसेच कर्मचारी कामगारांचे मोठ्या प्रमाणात आवागमन वाढल्याने  चोरी व अफरातफरी सारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. हंसराज अहीर यांनी मागील 3 वर्षांपूर्वी वेकोलिच्या सर्व क्षेत्रातील खुल्या कोळसा खाणीमध्ये ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा प्रस्ताव वेकोलि प्रबंधनापुढे ठेवत या विषयावर विस्तृत चर्चा केली होती परंतू संबंधीत अधिकाऱ्यांनी  या प्रस्तावाकडे दृर्लक्ष केल्याने वेकोलिच्या मालकीच्या किंमती कोळसा,  किमती मालाची, यंत्र सामुग्रीची सातत्याने चोरी तसेच अफरातफरी होत असल्यामुळे वेकोलिला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका व नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. हा प्रकार त्वरीत थांबविण्यासाठी ड्रोनचा उपयोग करून वेकोलिचे करोडो रूपयांचे नुकसान थांबवावे व अशा अनुचित प्रकारात गुंतलेल्या गुन्हेगारांना शोधुन त्यांचेवर कठोर कारवाई करावी असेही हंसराज अहीर यांनी यासंबंधाने पाठविलेल्या पत्रातून मागणी केली आहेे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

शिक्षा सुनावताच कोर्टातच कोसळला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *