Breaking News

तेलंगणात जनावरांची तस्करी ,  दोन ट्रक पकडले,  26 जनावरांची सुटका

तेलंगणात जनावरांची तस्करी
*  दोन ट्रक पकडले, * 26 जनावरांची सुटका

सिंदेवाही,
नागपूर जिल्ह्यातील जनावरांची सिंदेवाही मार्गे तेलंगणात कत्तलीसाठी तस्करी करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात सिंदेवाही पोलिसांना यश आले. दोन ट्रक पकडून 26 जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी 23 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार, 3 जुलै रोजी सिंदेवाही पोलिसांनी केली.

नागपूर जिल्ह्यातील दोन ट्रकद्वारे तेलंगणात तस्करी केली जात असल्याची माहिती सहायक पोलिस उपअधीक्षक अनुज तारे यांच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. संशयित वाहन येताच त्यांची चौकशी केली असता, दोन्ही ट्रकमध्ये तब्बल 26 जनावरांना कोंबले होते. ती जनावरे जप्त करून गोवंश शाळेत हलविण्यात आले. यातील आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सहायक पोलिस उपअधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश घारे, पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर, मंगेश श्रीरामे, अरविंद मेश्राम, विनोद बावणे यांनी केली.

About Vishwbharat

Check Also

बनावटी और झूठे आंसुओं का पर्दाफाश : ‘कातिल’ पत्नी गिरफ्तार

बनावटी और झूठे आंसुओं का पर्दाफाश : ‘कातिल’ पत्नी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

अभिनेता ने शादी से किया इनकार : दुष्कर्म केस में हुई गिरफ्तारी

अभिनेता ने शादी से किया इनकार : दुष्कर्म केस में हुई गिरफ्तारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *