Breaking News

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

Advertisements

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

Advertisements

मुंबई-
आपल्या भारतात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आज आधार कार्डला  खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असतोच. अशातच काही वेळा आपले आधार कार्ड घरी राहिले, किंवा हरवले तर खूप अडचण निर्माण होते. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड काही मिनिटात सहज डाऊनलोड करता येऊ शकते. यासाठी यूआयडीएआय (UIDAI ) कडून मदत करण्यात येणार आहे.

Advertisements

आधार कार्ड  बँकेपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नितांत आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन आता यूआयडीएआय (UIDAI) ने आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सोपी सहज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यूआयडीएआय (UIDAI) ने एक लिंक दिली आहे. याच्या मदतीने तुम्ही सहज आधार डाऊनलोड करु शकता. यूआयडीएआय (UIDAI) ने ट्विटरद्वारे एक डायरेक्ट लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही कधीही तुमचे स्वत:चे आधार कार्ड डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्ही या eaadhaar.uidai.gov.in लिंकची मदत घेऊ शकता. त्यामुळे सहजरित्या आधार कार्ड मिळणार आहे.
यूआयडीएआय (UIDAI) ची अधिकृत वेबसाइट https://eaadhaar.uidai.gov.in वर जा. यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला आधार डाऊनलोड करण्याचे तीन पर्याय दिसतील. पहिला पर्याय 12 आकडी आधार नंबर टाकण्याचा असेल, दुसरा एनरोलमेंट आयडी आणि तिसरा व्हर्च्युअल आयडी टाकण्याचा आहे. यापैकी कोणताही आयडी अथवा नंबर टाकून तुम्ही आधार कार्ड पुन्हा डाऊनलोड करु शकता. संपूर्ण माहिती भरल्यानंतर इमेजमध्ये  देण्यात आलेले कॅरेक्टर्स टाइप करा आणि त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. वन-टाइम पासवर्ड आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबर येईल. व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर नंबर एसएमएसद्वारे मिळेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्डची माहिती आणि आधार डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल. यानंतर डाऊनलोड पर्यायावर क्लिक करुन सेव्ह करुन तुमचे आधार कार्ड मिळवता येईल.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

राज्यातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर

राज्य शासन शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांनी सामूहिक …

नागपुरात पुस्तक व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक : गुन्हा दाखल

नागपुरातील एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई व नवामोंढा येथील पाच जणांनी 1 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *