Breaking News

नो कम्प्लेंट डे! (जीवनात काहीही तक्रार नाही दिवस)

Advertisements

नो कम्प्लेंट डे!
(जीवनात काहीही तक्रार नाही दिवस)

Advertisements

हल्ली खूप सारे ‘डे’ साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे.

Advertisements

कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी टिचर्स डे, कधी चॉकलेट डे, कधी फ्रेन्डशिप डे तर कधी वुमन्स डे ……..

वर्षभरातील जवळपास प्रत्येक दिवस कुठल्यातरी ‘डे’साठी ‘फिक्स’ केलेला आहे.

जेव्हा की आपल्याकडे (म्हणजे भारतात) अशा प्रकारचे ‘डे’ साजरे करण्याची आवश्यकताच नाही. कारण फक्त त्या ‘डे’ च्या दिवशीच नाही तर संपूर्ण वर्षभर आपण या लोकांचा सन्मान करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे. ……

आपल्याकडे खरी गरज आहे ती स्ट्रेस फ्री डे, नो चिडचीड डे, अ‍ॅप्रीशिएशन डे आणि नो कम्प्लेंट डे सारखे ‘डे’ साजरे करण्याची….

आपण आयुष्य आनंदाने जगतच नाही, कायम कसली तरी कम्प्लेंट करीत असतो, आज काय चहात साखरच कमी होती, भाजीत मिठच जास्त होतं, गाडीत पेट्रोलच नव्हतं, तिथे पंखाच नव्हता, त्याने मला विचारलंच नाही, मला बसायला खुर्चीच नव्हती, त्याने मला निमंत्रणच दिलं नाही, प्यायला थंडगार पाणीच नाही, पायात घालायला चांगले पॉलीश केलेले शूज नाही, चांगले कपडेच नाही, माझ्याजवळ अ‍ॅपलचा मोबाईलच नाही आणि बरंच काही, नुसती कम्प्लेंट आणि कम्प्लेंट!

अरे आपण कधी ‘खुश’ राहणार. जे आहे त्यात खुश राहता येऊ शकत नाही काय?

एखादे दिवशी चहात साखर कमी झाली म्हणून एवढी चिडचिड करायची काही आवश्यकता नाही झाली तर झाली कमी साखर कुणी मुद्दामहून तर असं करीत नाही ना.

आपणच आपलं Observe करू या की, आपण किती गोष्टीवर उगीचच चिडचिड करतो. दिवसभरात किती कम्प्लेंटस करत राहतो आणि ठरवून टाकू की किमान एक दिवस तरी ‘नो कम्प्लेंट डे’ साजरा करु या.

खरं तर एरवी हे ‘डे’ वर्षातून एकदाच असतात. आपण मात्र नो कम्प्लेंट डे, अगोदर महिन्यातून एकदा मग आठवड्यातून एकदा आणि सवय झाल्यावर मग रोजच्या रोज साजरा करू या… बघा ‘मजा’ येईल….!

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *