वर्धा:जिल्हा प्रतिनिधी:- केंद्र सरकारने इंधनावरील कर कपात केल्यामुळे राज्यात पेट्रोल व डिझेलचे प्रतिलिटर भाव पाच व दहा रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय तेलंगना, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील अबकारी करात कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यात त्वरित व्हँट कपात केली. त्यामुळे तेथील इंधनाचे भाव 4 ते 17 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील अबकारी करात कपात करून पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करावेत, अशी मागणी आमदार रामदास आंबटकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यातील गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेश सिमेवरील नागरिक पेट्रोल- डिझेलसाठी धाव घेत असल्याचे चित्र निर्माण आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पेट्रोल- डिझेलवरील कर कपात करण्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे व्रत्त होते. परंतु, त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.
राज्यातील जनता अधिच महागाईने होरपळत आहे. पेट्रोल- डिझेलमुळे वाहनांच्या भाडेवाडीचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागिरकांना बसत आहे. याचा विचार करून राज्य सरकारने त्वरित तातडीची बैठक बोलावून पेट्रोल- डिझेलवरील अबकारी कर कमी करावा व राज्यातील वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार आंबटकर यांनी केली आहे.
राज्यात पेट्रोलचे भाव 110 ते 120 रुपये लिटर आहेत. तर हेच दर कर्नाटकमध्ये 93. 21 रुपये, गुजरातमध्ये 98 रुपये आहेत. असे असले तरी महाराष्ट्र सरकारने पेट्रोल- डिझेलवरील करात कोणतीही कपात केलेली नाही. त्यासाठी राज्य सरकारने त्वरित निर्णय घेऊन राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, असे म्हटले आहे.