Breaking News

आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया- आमदार डॉ.पंकज भोयर

Advertisements
आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया-  आमदार डॉ.पंकज भोयर
आरोग्य मंत्री टोपे यांनी दिले तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
वर्धा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणा-या  आशा कामगार व गट प्रवर्तक महिलांना  निश्चित वेतन देण्यात यावे व कामाच्या  मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ.पंकज भोयर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तातडीने यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले. त्यामुळे आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांची मागणी लवकर पुर्ण होण्याची शक्यता आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनातून आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आशा वर्कस व गटप्रवर्तकांच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.राज्यातील 72 हजार  आशा कर्मचारी आणि 3500 गटप्रवर्तक महिला  लोक राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कामावर आहे. त्या ग्रामीण व शहरी भागात आरोग्याच्या सुविधा पुरविण्याचे काम करतात. कोरोना काळात त्यांचे कार्य उल्लेखनिय राहिले आहे. परंतु त्यांना राज्य सरकार कडून निश्चित वेतन दिल्या जात नसल्याने त्यांच्या समोर गंभीर पेच उभा ठाकला आहे. आरोग्य विभागाने त्यांच्यावर 73 प्रकारची कामे सोपविली आहे. गावा-गावातील आरोग्याचे सर्वेक्षण करणे, गारोदर मातांना  प्राथमिक आरोग्य केंद्रात  घेउन जाणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त, मानसिक त्रासाचे सर्वेक्षण, दुग्धपान मदत, ग्राम आरोग्य समितीचे काम, टीबी  कुष्ठरोग, कर्करोग, हृदयविकार, मलेरिया पासून ते सर्व संसर्यजन्य  रोगाचे,डेंग्यू , प्लू, कोविड 19 इ. साथीच्या रोगाचे सर्वेक्षण आशा कर्मचा – याना करावे लागते. पण त्यांना महिन्याला नाममात्र मानधन देण्यात येते. मागील 10 वर्षापासून त्यांचे काम सुरू असून कामाच्या तुलनेत ही रक्कम फारच नगण्य मानधन असून त्यांचे शोषण करणारे आहे. देशातील अनेक राज्यात आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांना महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक वेतन दिल्या जात आहे. केरळसह काही राज्यात 7 ते 10 हजार पर्यंत वेतन दिल्या जाते.  मागील 5 ते 6 वर्षांपासून आशा कर्मचारी व गटप्रर्वतक सतत आंदोलन करीत आहे.
सप्टेंबर 2019 झालेल्या आंदोलनामुळे राज्य शासनाने आशा व गटप्रवर्तक कर्मचारी यांच्या मानधनात  2000 रुपये वाढ करण्याचा आदेश काढला.परंतु  वाढीव मानधन दरमाह मिळत नसल्याची कर्मचा-यांची तक्रार आहे. मागील सहा महिन्यांपासून वाढीव मानधन आशा कर्मचारी व गटप्रर्वतकांना मिळाले नाही. कोरोना काळात उल्लेखनिय कार्य करणा-या आशा कर्मचारी व गटप्रर्वतकांना जुलै महिन्यासून वाढीव रक्कम देण्यात येणार होती. आशा कर्मचारी यांना 1 हजार रूपये तर आशा प्रवर्तकांना 1200 रूपये तसेच 500 रूपये कोविड भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु हा वाढीव भत्ता अदयापही आशा कर्मचारी व गटप्रर्वतकांना मिळाला नसल्याचे आमदार डॉ.पंकज भोयर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांच्या निर्देशनास आणून दिले. यावेळी आमदार भोयर यांनी आशा कर्मचारी व गटप्रर्वतकांच्या मागण्यांबाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. टोपे यांनी आशा कर्मचारी व गटप्रर्वतकांच्या मागण्या रास्त असून या संदर्भात तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन देऊन संबधित अधिका-यांनी तातडीने प्रश्न निकाली काढण्याची सूचना केली.
आमदार डॉ. भोयर यांनी सतत आशा कर्मचारी व गटप्रर्वतकांचा प्रश्न लाऊन धरला
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आशा कर्मचारी व गटप्रर्वतकांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन पातळीवर नेहमीच प्रयत्नशिल राहिले आहे. यावेळी देखील त्यांना आमचे प्रश्न शासन दरबारी पोहचविले असून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे.
मिनाक्षी गायकवाड, सिटू संगठन प्रमुख
Advertisements

About Vishwbharat

Check Also

राज ठाकरेंनी दिला BJP ला पाठिंबा

मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात …

काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *