वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन:
ज्या कुटुंबातील कर्त्या आईवडिलांचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला अशा वर्धा जिल्ह्यातील परिवारांमधील मुलामुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या संगोपनाची तसेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी मेघे समूहाद्वारे उचलण्यात येणार आहे. याशिवाय, आर्थिक परिस्थिती नसलेल्या व पितृछत्र हरविलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारीही हिंगणा, नागपूर येथील मेघे समूहाच्या नेहरू बालसदन व साई आश्रम या सेवाभावी संस्थेद्वारे स्वीकारण्यात येणार आहे अशी माहिती सावंगी मेघे येथे आयोजित पत्रकार परिषदेत विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी पत्रकारांना दिली.
तसेच दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठांतर्गत कार्यान्वित सालोड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतनीकरणाचे ४ जानेवारीला उद्घाटन मंगळवार, दि. ४ जानेवारी रोजी राज्याचे पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आणि आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तसेच गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस प्रशासनाद्वारे ज्येष्ठांसाठी नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली असून शिबिरातील गरजू रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया रोटरी क्लब गांधी सिटी यांच्या सहकार्याने सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात पूर्णतः मोफत करण्यात येत असल्याचेही या पत्रकार परिषदेतून माहिती दिली,
यावेळी कुलगुरू राजीव बोरले, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ,अभ्युदय मेघे,संजय इंगळे तिगावकर इतर उपस्थित होते,