त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना
– कॅम्प डीमोलेशन दरम्यान लोखंडी पोल पडला मजुराच्या अंगावर
– त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना
– मजुराच्या मृत्यूमुळे मजुरांमध्ये संताप
– सेफ्टी साधने असती तर वाचले असते प्राण
वर्धा जिल्हा प्रतिनिधी:वर्धा हिंगणघाट व वर्धा आर्वी महामार्गाचे सिमेंटीकरण करणाऱ्या त्रिनेवा कंपनीमध्ये सुपरवायझरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पोकल्यान्डच्या साहाय्याने कॅम्प कार्यालयाचे डीमोलेशन करीत असताना सुपर विझन करणाऱ्या सुपरवायझर किरण बावणे यांच्या डोक्यावर लोखंडी पोल पडला. या घटनेत किरणचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे मजुरांसह स्थानिकांनी संताप व्यक्त करीत किरणचा मृतदेह आणून नातेवाईकांनी कंपनीच्या गेटसमोर एकत्र होत कंपणीविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती हाताळली पण नेमका गुन्हा कुणावर दाखल करण्यात आलाय यावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
वर्धा – हिंगणघाट मार्गाचे बांधकाम करणाऱ्या त्रिनेवा कंपनीचे वर्धा हिंगणघाट मार्गावर नेरी गावालगत प्लांटचे कॅम्प कार्यालय आहे, काम पूर्ण झाल्याने येथील प्लांट बंद करण्यात आला.त्यामुळे या प्लांटचे डीमोलेशनचे काम सुरू आहे, डीमोलेशन दरम्यान किरण बावणे हा सुपर वायझर म्हणून कार्य करीत होता. पोकल्यान्डच्या सहाय्याने सदर प्लांटचे बांधकाम तोडत असतांना मोठा लोखंडी पोल किरण बावणे याच्या अंगावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला, त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, काम सुरू असताना कंपनीकडून कुठल्याही प्रकारच्या सेफ्टी ची काळजी घेण्यात आली नसल्याचा आरोप होत आहे. मृतदेहाचे शव विच्छेदण झाल्यानंतर त्याच्या परिवारने मृतदेह हा कंपनीच्या गेट समोर आणून ठेवला व परिवारातील सदस्य उपस्थित मजूर कर्मचारी व नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला,सदर कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.