अमरावती : शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवारी दुपारी बिबट्याचे दोन बछडे दिसले. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यांना वडाळी येथील वन उद्यानात ठेवण्यात आले आहे. महादेव खोरी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला आहे.
जवळ असलेल्या पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग असल्याचे कळते. तर, बछडे दिसल्यानंतर लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट मादी पळून गेली. वनविभागाच्या पथकाने या बछड्यांना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. या बछड्यांना त्यांच्या जन्मदात्रीकडे परत सोडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते.