मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांंना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली.याची सूत्रे थेट दिल्लीतून हलवली जात आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यात प्रमुख भूमिका बजावत आहेत. शिंदे यांनी प्रारंभिक बोलणी केल्यावरच पुढील पावले पडत आहेत, असेही बोलले जात आहे.
राज्यात काँग्रेसची सत्ता येणे कठीण झाले आहे. चव्हाण यांना आता मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा नसली तरी किमान मंत्रीपद हवे आहे. म्हणून त्यांनी भाजपकडे मोर्चा वळवला आहे. ही बाब हेरून दिल्लीतून शिंदे यांच्यावर खास जबाबदारी देण्यात आली. ज्योतिरादित्य यांचे वडिल माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडिल शंकरराव चव्हाण यांच्यात चांगले संबध होते. चव्हाण यांनी सोबत किमान १५ आमदार आणावेत, अशी भाजप श्रेष्ठींची अपेक्षा असल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.