Breaking News

नागपुरातील सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात, दोन चिमुरड्यासह चौघे ठार

Advertisements

 

नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंच फ्लायओवरवरून खाली फेकले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचाही समावेश आहे.

Advertisements

सक्करदरा परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फ्लायओवरवर गर्दीतून जाताना अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. दुचाकीवरील चौघेही सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खाली असणाऱ्या रस्त्यावर फेकले गेल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले आहे. या चौघांणा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisements

धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो कारच्या मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतामध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर चारचाकीने धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकी वर बसलेले चौघेही गंभीर जखमी झाले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर शहरातील पंचनामे सुरु : ग्रामीणमधील 27 तलाठी सहभागी

नागपूर शहरात शनिवारी नाग नदीच्या पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. त्या घरांचे पंचनामे …

ऊर्जामंत्र्यांच्या नागपूर शहरात १०७ वीजचोऱ्या उघड

ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महावितरणच्या नागपूर शहर मंडळ आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *