महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता स्वतःच्या पिस्तुलातून डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या असून त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून तीन गोळ्या स्वतःवर झाडल्या त्यातील एक गोळी मेंदूतून आरपार बाहेर गेली तर दोन गोळ्या लागल्या नाहीत. ही घटना शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली .कुटुंबीयांनी त्यांना तातडीने लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये साडे अकराच्या सुमारास दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून रात्री दोन वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली.
प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी बोलताना सांगितले. बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेण्याचे नेमके काय कारण आहे? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.