शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी; 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक
छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. आरडीसी महोदयांनी शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रकरणात लाखों रुपये कर्मचाऱ्यांनाकडून घेतल्याची माहिती आहे. पैशाशिवाय काम करीत नसल्याच्या खिरोळकर यांच्याविरोधात तक्रारी आहेत.