Breaking News

रेल्वे तिकीट बुकिंग आता आणखीण सोप्पे

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला ट्रेनचं तिकीट आणखीण सोप्प्या पद्धतीत बुक करता येणार आहे. त्यामुळे करोडो प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे.

Advertisements

रेल्वेकडून प्रवाशांना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. या सुविधा आणखी सुलभ होण्यासाठी रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. आता अशीच एक सुविधा रेल्वे घेऊन आली आहे. या सेवेमुळे आता तुम्हाला तिकीट बुक करण्यासाठी IRCTC अ‍ॅपवर जाण्याची गरज नाही. तसेच तुम्ही अ‍ॅपवर लॉग इन न करता तुमचे तिकीट बुक करू शकणार आहे.

नवीन सुविधा
आतापर्यंत वेबसाईट आणि अ‍ॅपवर तिकीट बूक करता येत होतं. मात्र आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही IRCTC च्या चॅटबॉटवरूनच तिकीट आरक्षित करू शकता. रेल्वेकडून प्रवाशांसाठी (Railway Passenger) खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे फिचर नुकतेच सादर करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही सहज तिकीट बुक करू शकता.

IRCTC च्या वेबसाइटनुसार, सध्या दररोज 10 लाखांहून अधिक लोक वेबसाइटवरून तिकीट बुक करतात. याशिवाय प्रवासी अ‍ॅप आणि स्टेशनच्या माध्यमातूनही तिकीट काढतात. या दरम्यान अनेक वेळा वेबसाईट नीट काम करत नसल्याने प्रवाशांना वेळेवर तिकीट मिळण्यास अड़थळा येतो,हे लक्षात घेऊन रेल्वेने चॅटबॉटची सुविधा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या सुविधेत तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क भरावे लागणार नाही, जेवढे शुल्क तुम्हाला वेबसाइटवर तिकीट बुक करण्यासाठी द्यावे लागेल, तेवढेच शुल्क तुम्हाला चॅटबॉटवर द्यावे लागेल.

दरम्यान या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना (Railway Passenger) तिकीट काढणे आणखीण सुलभ होणार आहे. प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मतदानावर होणार उष्णतेचा परिणाम? हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) एप्रिल ते जूनदरम्यान देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली …

टोलनाके होणार बंद? नवी यंत्रणा कशी असेल?

केंद्र सरकारने पथकर संकलनासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आधारित यंत्रणा आणण्याची योजना आखली आहे. ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *