एकनाथ खडसे राष्ट्रवादीतही नाराज… वाचा नक्की काय

विश्व भारत ऑनलाईन :

भाजपमध्ये पक्ष नेतृत्वाविरोधात आवाज उठविल्याने एकनाथ खडसे यांची कोंडी झाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही तीच परिस्थिती एकनाथ खडसे यांच्यासमोर येऊ शकते. निमित्त होते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा जळगाव दौरा.

एका कार्यक्रमात अजित पवारांसमोरच जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर खडसे यांनी नाराजी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घरीच असतात, पण कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

नाथाभाऊचा गट वेगळा, इतरांचा गट वेगळा, अशी स्थिती राहिली तर पुढील काळात अवस्था बिकट राहील, असा धोक्याचा इशाराही एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना भरसभेत दिला. एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या समस्यांचा पाढाच अजितदादांसमोर वाचला. ओके म्हणून खोके म्हणून चालणार नाही, पक्षाने आक्रमक व्हायला पाहिजे, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी अजित पवारांसमोर केली.

एकनाथ खडसे यांनी 2020 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, यानंतर याच वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. विधानपरिषदेत निवडणुकीत विजय झाल्यानंतर खडसेंना मोठं मंत्रिपद मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जात होती, पण खडसे आमदार झाले, मात्र विधानपरिषद निवडणुकीनंतर लगेचच राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं.

About विश्व भारत

Check Also

सुधीरभाऊंसाठी ‘लाडक्या बहिणी’ बनल्या रणरागिणी

बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू …

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर

नागपुर में प्रियांका गांधी के रोड शो की चर्चा जोरो पर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *