विश्व भारत ऑनलाईन :
मुंबई पुणे एक्प्रेस वे चा प्रवास महाग होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टोलमध्ये ङोणारी १८ टक्के वाढ. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये लवकरच वाड होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे. कारण १ एप्रिल २०२३ पासून या टोलमध्ये १८ टक्के वाढ होणार आहे.
दर तीन वर्षांनी १८ टक्के टोलवाढ
२००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ केली जाईल अशी सूचना काढण्यात आली होती. याआधी १ एप्रिल २०२० पासून टोल वाढला होता. आथा २०२३ च्या १ एप्रिलपासून टोल पुन्हा वाढणार आहे. १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर २०३० पर्यंत कायम असतील असं एमएसआरडीसीने सांगितलं आहे.
१ एप्रिल २०२३ पासून टोल किती वाढणार?
✳️वाहन सध्याचे दर १ एप्रिल २०२३ पासूनचे दर
✳️कार २७० रूपये ३२० रूपये
✳️टेम्पो ४२० रूपये ४९५ रूपये
✳️ट्रक ५८० रूपये ६८५ रूपये
✳️बस ७९७ रूपये ९४० रूपये
✳️थ्री एक्सेल १३८०रूपये १६३० रूपये
✳️एम एक्सेल १८३५ रूपये २१६५ रूपये