Breaking News

मल्टिप्लेक्समध्ये बघा सिनेमा 75 रुपयांत…पण, कोणत्या तारखेला… वाचा

विश्व भारत ऑनलाईन :

मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्यात येणार आहे.या दिनाचे औचित्य साधून देशभरातील सर्व सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांकडून फक्त ७५ रूपयांचे तिकीट घेऊन सिनेमा दाखवला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा दिवस साजरा केला जाणार आहे. चित्रपट पाहणाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आणि एकप्रकारे पर्वणीच ठरेल.

कुठे बघायला मिळणार?

पीव्हीआर, आयनॅाक्स, कार्निवल, सिनेपॅालिस, मिराज, सिटीप्राईड, एशियन मुक्ता ए२, वेव, मूवीटाईम, एम२के, डिलाईट यासारख्या महागड्या आणि अन्य सर्व सिनेमागृहांमध्ये हा उपक्रम दाखवला जाणार आहे. केवळ ७५ रूपये शुल्क आकारून चित्रपट दाखवणे ही प्रेक्षकांकरिता मोठी मेजवानी असणार आहे. त्यामुळे या राष्ट्रीय सिनेमा दिनी सर्व सिनेमागृहे हाऊसफुल्ल असणार हे निश्चित आहे.

राष्ट्रीय सिनेमा दिन हा दिवस १६ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार होता. पण हा निर्णय आता बदलण्यात आल्याचे मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे. १६ सप्टेंबर ही तारीख बदलून आता २३ सप्टेंबर रोजी हा राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे चित्रपट चाहत्यांनी याची नोंद घ्यावी, की २३ सप्टेंबर रोजी देशभरामध्ये सिनेमागृहांमध्ये ७५ रूपयांमध्ये सिनेमा दाखवला जाईल.

About विश्व भारत

Check Also

जुही चावला देना चाहती है अर्जुन कपूर को मौका

जूही चावला के पति अब बूढ़े हो चुके है, लेकिन जूही की जवानी अभी ढली …

एक दो की नहीं पूरे 160 बच्चों की मां है यह अभिनेत्री

अभिनेत्री आयशा जुल्का आज भी लोगों के बीच पॉपुलर हैं. अपनी खूबसूरती से लोगों के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *