विश्व भारत ऑनलाईन :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कोणत्याही प्रकारे खडाजंगी झालेली नाही. कोणतीही योजना प्रसारमाध्यमामध्ये उघड करू नका, असे हसतहसत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलले,असे म्हणत सत्तारांनी झापाझापी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले, त्यादिवशी काय झाले होते. याबाबत अब्दुल सत्तार यांनी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, खडाजंगी झाली नाही. असेच हसता-हसता मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. धोरणात्मक निर्णय थेट जाहीर करु नका. माध्यमांनी याला वेगळ्याच प्रकारे दाखवले. त्यांची बोलण्याची पद्धत, माझी बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मी रफटफ बोलतो, ते अगदी चौकटीत बसणारे बोलतात. ते वेल एज्युकेटेड आहेत, वकील आहेत. त्यांच्या बोलण्याचा उद्देश असा होता की मार्चच्या बजेटमध्ये याची तरतूद करु.