Breaking News

शिवसेना कोणाची? निर्णय अंतिम टप्प्यात… वाचा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

शिवसेना नेमकी कोणाची हा निर्णय आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येतील. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं? याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात वाद सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर जाऊन एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचं सांगणार आहेत.

Advertisements

हे सगळे आमदार आम्ही स्वमर्जीने एकनाथ शिंदेंसोबत आहोत, अशाप्रकारचं शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर करू शकतात. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे असतील तर ते याबाबत प्रश्न विचारू शकतात. याआधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र निवडणूक आयोगाला दिलं आहे.

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, यानंतर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP की घोषणा से पहले ही पूर्व संसद संजय निरुपम ने मैनिफेस्टो को लेकर कांग्रेस को घेरा

BJP की घोषणा से पहले ही पूर्व संसद संजय निरुपम ने मैनिफेस्टो को लेकर कांग्रेस …

फडणवीस, वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? चर्चाना उधाण

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भजपमध्ये प्रवेश करतील,असा दावा करून राज्याचे अन्न व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *