विश्व भारत ऑनलाईन :
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने बैठक आयोजित केली होती. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते आणि अनेक आमदार या बैठकीला गैरहजर असल्याने काँग्रेस वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
दिग्गज अनुपस्थित
काँग्रेसच्या आजच्या बैठकीला सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे,अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, सतेज पाटील, के. सी, पाडवी, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, विक्रम सावंत, रणजित कांबळे अनुपस्थित होते. यावर विचारले असता नागपूरहुन येणारे विमान रद्द झाल्याने अनेक नेते येऊ शकले नाही. तर अमित देशमुख परदेशात आहेत. संग्राम थोपटे यांची प्रकृती ठीक आहे. सुशील कुमार शिंदे बाहेर आहेत, त्यामुळे हे लोक गैरहजर असल्याचं समजले.