देशातील ‘ही’ बँक होणार बंद, तुमचे तर पैसे नाहीत ना? वाचा…

मुंबई : देशातील एका सहकारी बँकेला दोन दिवसांनी टाळं ठोकण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या बँकेची बँकिंग सेवा 22 सप्टेंबरपासून बंद होणार आहे.

या बँकेत खाते असल्यास ताबडतोब पैसे काढा, अन्यथा 22 सप्टेंबरनंतर खात्यातून पैसे काढता येणार नाही, असं आवाहनही खातेधारकांना करण्यात आलंय. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लि.ला टाळं लागणार आहे.

फक्त 2 दिवस

ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँकेने पुण्यातील रुपी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बँक 22 सप्टेंबरला आपलं सर्व कामकाज कायमचं बंद करणार आहे. त्यामुळे खात्यातून पैसे काढण्यासाठी खातेधारकांकडे अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. यानंतर ग्राहक त्यांचे पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयनुसार, रुपी सहकारी बँक लिमिटेडची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. तसेच बँकेकडे कोणतेही भांडवल शिल्लक नव्हते. यामुळे केंद्रीय बँकेने त्यांचा बँकिंग परवाना रद्द केला.

About विश्व भारत

Check Also

सभी वर्ण साथ बनेंगे दूल्हा- दुल्हन : सभी वर्ग विशेषज्ञ कराएंगे विवाह।

सभी वर्ण साथ बनेंगे दूल्हा- दुल्हन : सभी वर्ग विशेषज्ञ कराएंगे विवाह। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर कोणती कारवाई होणार?

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *