Breaking News

5G चे युग : 10 सेकंदांत करा 2-GB चित्रपट डाउनलोड

विश्व भारत ऑनलाईन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 ऑक्टोबरला देशात 5G सेवेचा श्रीगणेशा करतील. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘भारताचे डिजिटल परिवर्तन व कनेक्टिव्हिटीला एका नव्या उंचीवर घेऊन जात, पीएम मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करतील.’

एअरटेल व जिओत चढाओढ

दूरसंचार क्षेत्रताील एअरटेल व जिओ या 2 दिग्गज कंपन्या आपली 5G नेटवर्क सेवा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. एअरटेलने यासाठी एरिक्सन, नोकीया व सॅमसंगसोबत करार केला आहे. ही पाचव्या पीढीची दूरसंचार सेवा कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकांची अनेक कामे वेगवान होणार आहेत.

5G नेटवर्क 4G पेक्षा वेगळे कसे?

5G वायरलेस नेटवर्कसाठी एक निश्चित जागतिक मानक आहे. 5G ची कनेक्टिव्हिटी 4G खूप वेगवान असेल. गेमिंग आणि मनोरंजनाच्या बाबतीतही ते 4G पेक्षा वरचढ असेल. त्याचा वेग 4G हून 100 पट जास्त असेल. परिणामी, तुम्हाला अवघ्या 10 सेकंदांत 2 GB चा चित्रपट डाउनलोड करता येईल.

एअरटेलची आघाडी

✳️2018 मध्ये भारतात 5G तंत्रज्ञानाची चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी होती.
✳️गतवर्षी एअरटेलने दिल्ली बाहेरील भागात देशातील पहिली ग्रामीण 5G चाचणी घेतली.
✳️700 MHz बँडवर 5G ची चाचणी करणारी Airtel देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

About विश्व भारत

Check Also

यह कैसा दुर्भाग्य, मुझे लेने कुत्ता एयरपोर्ट आता है? केंद्रीय मंत्री गडकरी नें क्या कहा?

यह कैसा दुर्भाग्य, मुझे लेने कुत्ता एयरपोर्ट आता है? केंद्रीय मंत्री गडकरी नें क्या कहा? …

दोस्त ने जन्मदिन पर हाथ में थमा दिया जहरीला सांप

दोस्त ने जन्मदिन पर हाथ में थमा दिया जहरीला सांप   टेकचंद्र सनोडिया शास्त्री : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *