Breaking News

नागपुरात फडणवीसांसमोरच गडकरींची नाराजी… असं काय झालं… वाचा

विश्व भारत ऑनलाईन :

अपंग व ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वितरण उपक्रमासाठी दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी काम केले नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. तर दक्षिण नागपुर मतदार संघातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्ती करणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मतदार संघातील अपंग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात आले त्यावेळी गडकरी बोलत होते. रामदासपेठ येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी म्हणाले, शहरातील सहा मतदार संघात ही योजना राबविण्यासाठी प्रशासनाने चांगले काम केले.

दक्षिण नागपुरात उत्तम काम झाले असताना दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील मतदार संघातील कार्यकर्त्यानी कामच केले नसल्यामुळे त्यांना ५० टक्केपेक्षा कमी गुण दिले जाईल,असे सांगत गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच त्यांच्या मतदार संघातील कार्यकर्त्याबाबत नाराजी व्यक्त केली. खरे तर दोन मतदार संघ मिळून दहा हजार लोकांनी या योजनेचा फायदा घेणे अपेक्षित होते पण ते दिसत नाही. त्यामुळे कोणी किती काम केले हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मनाला विचारा,असा उपदेश करत कार्यकर्त्याचे कान टोचले. या कार्यक्रमाचा उद्देश हा राजकीय नाही. लोकांची सेवा केली तर त्यांच्यापुढे छायाचित्र घेऊन जाण्याची वेळ येणार नाही. लोकांच्या सेवेतून मत मिळवले पाहिजे असे सांगत त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे सुनावले.

About विश्व भारत

Check Also

अहमदाबाद विमान अपघातासाठी प्रफुल्ल पटेल जबाबदार : नाना पटोलेंचा गंभीर आरोप

तत्कालिन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात विमानांच्या खरेदीबाबत …

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *