Breaking News

चहाची तलब आणि अख्ख कुटुंब अपघातातून बचावले…

विश्व भारत ऑनलाईन :

देव तारी त्याला कोण मारी आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशा अनेक म्हणी तुम्ही ऐकल्या असतील. याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही बऱ्याचदा समोर येत असतात. अशीच एक घटना आता नाशिकमधून समोर आली आहे. या म्हणीचा प्रत्यय मालेगावपासून जवळ असलेल्या जळगावचोंडी या गावातील ग्रामस्थांना आला. याच चहा पिण्यासाठी गेल्याने एका कुटुंबावरील मोठं संकट टळलं.

चहा पिण्यासाठी कारमधून उतरताच भरधाव वेगाने जाणारा एक ट्रक कारवर पलटी झाला. यात कार ट्रकखाली पूर्ण दाबली गेली. नशीब बलवत्तर होतं म्हणून संपूर्ण कुटंब वाचल्याची चमत्कारिक घटना पुणे-इंदौर महामार्गावर घडली. या घटनेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यामुळे जर कारमधून सर्वजण उतरले नसते तर यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

घटनेत नातेवाईकांकडे गेलेलं कुटुंब मालेगावकडे परत जात असताना जळगावचोंडीजवळ चांगला चहा मिळतो म्हणून ते चहा पिण्यासाठी उतरले. यावेळी त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. तेवढ्यात प्लास्टिकचा कच्चा माल घेऊन पुण्याकडे जाणारा ट्रक कारवर जाऊन आदळला.

भरधाव वेगाने जाणारा ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे थेट कारवर जाऊन आदळला आणि यात कारचा चक्काचूर झाला. ते दृश्य पाहून कारमधून उतरलेल्या कुटुंबाचा थरकार उडाला. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने त्यांचा जीव वाचला. ही घटना घडली तेव्हा हे कुटुंब कारमध्ये असतं तर किती मोठी दुर्घटना झाली असती याचा अंदाज कारची अवस्था पाहून येतो.

About विश्व भारत

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके …

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात : न्यायालयाकडून लवकरच निर्णय

भाजपचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *