वर्धा-देवळी मार्गावर अपघात : 12 गंभीर

 

विश्व भारत ऑनलाईन :
वर्धा जिल्ह्यातील देवळी मार्गावर भीषण अपघात झालाय. मजूरांना घेवून जाणाऱ्या एका वाहनाला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

अपघातात मालवाहू वाहनातील चालकासह १० महिला जखमी झाल्या. तर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल केले.

सालोड हिरापूर येथील विजय दाते शेतीच्या कामासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी मुलासह दहा जण प्रवास करीत होते. देवळी महामार्गावर जयस्वाल यांच्या धाब्याजवळ वर्धेवरून देवळीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मालवाहू वाहनाला धडक दिली.धडकेत मालवाहू ऑटो रस्त्याच्या कडेला जाऊन धडकला तर कार शंभर मीटर अंतरावर जाऊन उलटली.

अपघातात ऑटो चालक विजय दाते यांच्यासह मनीष दाते,जया दाते, आदित्य घडमोडे,अनिता घडमोडे,सीमा खोबरे,रेखा वरठी सह अन्य तीन मजूर जखमी झाले. तर कारमधील चालकासह दोघे जण जखमी झाले. या अपघाताची सावंगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

मेलघाट धारणी सडक निर्माण कार्यों में अनियमितताएं और भ्रष्टाचार

मेलघाट धारणी सडक निर्माण कार्यों में अनियमितताएं और भ्रष्टाचार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *