भक्तांनो,जाणून घ्या…महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील नवरात्रोत्सव

विश्व भारत ऑनलाईन :

  • 🙏तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र पूर्ण शक्तिपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलदेवता आहे.

घटस्थापनेचा कार्यक्रम : पहाटे २.३० वाजता मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना. नंतर पंचामृत स्नान. { सकाळी ६ वाजता नित्योपचार अभिषेक पूजा. { दुपारी १२ वाजता घटस्थापनेने मातेच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ. { रात्री १०.३० वाजता मातेचा छबिना काढला जाईल.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मातेचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती पद्धतीची.

  • 🙏काेल्हापूर : मानाच्या तोफेच्या सलामीनंतर होणार घटस्थापना

कोल्हापूर येथील श्री करवीरनिवासिनी अंबाबाई ही महाराष्ट्रातील देवीच्या शक्तिपीठांपैकी एक आहे. दक्षिण काशी अशी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची ओळख आहे. येथून जवळच जोतिबाचे मंदिर आहे.

घटस्थापनेचा कार्यक्रम : पारंपरिक पद्धतीने सोमवारी सकाळी ८.३० वाजता मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर अंबाबाईच्या मंदिरासह विविध मंदिरांत घटस्थापना होईल. {नवरात्रीच्या पूर्वसंध्येला श्री अंबाबाईची पारंपरिक पद्धतीने पूजा बांधण्यात आली. {सायंकाळी वाद्यांच्या गजरात ज्योती नेण्यास प्रारंभ झाला.

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात या शहराचा मोठा विकास झाला.

  • 🙏माहूर : पहाटे ५ पासून घेता येईल दर्शन, १०.३० वाजता घटस्थापना

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ म्हणून माहूरची श्री रेणुकामाता प्रसिद्ध आहे. पूर्वाभिमुख असलेल्या श्री रेणुकामातेचे तांदळा स्वरूपातील तेज:पुंज मुखकमलाचे दर्शन भाविकांना होते.

घटस्थापनेचा कार्यक्रम : सोमवारी पहाटे ५ वाजेपासून भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर उघडणार { सकाळी ६ वाजता मातृतीर्थावरून अभिषेकासाठी पाणी आणणार. { सकाळी १०.३० वाजता होणार घटस्थापना { दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून देवीची आरती. नंतर छबिना.

नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर रेणुकामातेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादी काळापासून येथे आहे, असे मानले जाते.

  • 🙏वणी : मूर्ती संवर्धनानंतर घटस्थापना मुहूर्तावर देवीचे प्राचीन रूप दिसणार

वणीची सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथांत उल्लेखलेल्या पीठांपैकी एक आहे. साडेतीन पीठांपैकी अर्धे शक्तिपीठ. आद्यशक्तिपीठ शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘अर्धे शक्तिपीठ’ झाले.

घटस्थापनेचा कार्यक्रम : सकाळी ९.३० वाजता घटस्थापना होईल. { उत्सव काळात मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले असेल { भाविकांसाठी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत मोफत महाप्रसाद उपलब्ध असेल. { २५० बसेसची सोय करण्यात आली. {दर्शनासाठी तीन ठिकाणी दर्शन पादुका ठेवणार.

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे डोंगराच्या कडेला बांधलेले हे मंदिर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे.

About विश्व भारत

Check Also

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त गुरुकुंज अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित …

निर्माण श्रमिक को ई-स्कूटर में अनुदान सहायता योजना का लाभ

निर्माण श्रमिक को ई-स्कूटर में अनुदान सहायता योजना का लाभ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *