Breaking News

‘शिवभोजन थाळी’त गैरव्यवहार : शिंदे-फडणवीस सरकारला संशय

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शिवभोजन थाळी ही योजना बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे.

Advertisements

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जनतेला १० रूपयांमध्ये जेवण मिळत होते. कोरोना काळात किंमत 5 रूपये करण्यात आली होती. या योजनेमुळे गरीबांना मोठा आधार मिळत होता.

Advertisements

ही योजना काय आहे?

राज्यातील गरीबांना, गरजूंनाा सहज आणि अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे. राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे ५० रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ३५ रुपये अनुदान देण्यात येत होते. आता शिंदे फडणवीस सरकारला या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संश आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP की घोषणा से पहले ही पूर्व संसद संजय निरुपम ने मैनिफेस्टो को लेकर कांग्रेस को घेरा

BJP की घोषणा से पहले ही पूर्व संसद संजय निरुपम ने मैनिफेस्टो को लेकर कांग्रेस …

फडणवीस, वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? चर्चाना उधाण

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भजपमध्ये प्रवेश करतील,असा दावा करून राज्याचे अन्न व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *