Breaking News

नागपुरात मालगाडीवरून सेल्फी घेताना मुलगा होरपळला

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :
सेल्फी म्हणजे आताच्या तरुण पिढीचा जीव की प्राण. एका सेल्फीसाठी तरुण पिढी जीव धोक्यात घालते. अशीच एक दुर्देवी घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. मालगाडीवर चढून सेल्फी घेण्याच्या नादात एका 14 वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का लागून तो होरपळला. मोहम्मद आलम असं या मुलाचं नाव असून वांजरा परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद आलमवर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.

Advertisements

नेमकी घटना काय?

Advertisements

रविवारी मोहम्मद आलम हा आपल्या काही मित्रांसोबत वांजरा परिसरात उभा होता. या ठिकाणहून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर काही कारणास्तव मालगाडी थांबली. यावेळी मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी काढण्याचा मोह मोहम्मद आलमला झाला. पण हे किती धोकादायक ठरु शकतं हे त्याला कळलं नाही. मालगाडीच्या छतावर चढून आलमने सेल्फी घेण्यासाठी हात वर केला. पण त्याचा हात रेल्वेलाईनच्या उच्च दाबाच्या वाहिनीला लागला. काही कळायच्या हातच मोठा भडका उडला आणि विजेच्या धक्क्याने तो लांब फेकला गेला.

धक्कादायक म्हणजे आलम गंभीर जखमी झाल्याचं पाहून त्याची मदत करण्याऐवजी त्याच्याबरोबरच्या मित्रांनी भीतीने पळ काढला. मोठा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी गर्दी केली. आरपीएफचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. काही लोकांनी जखमी अवस्थेत असलेल्या आलमला तात्काळ नागपूरच्या शासकीय मेडीकल कॉलेज व रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पूर्व CM उद्धव ठाकरे गुट का भविष्य पांच मुद्दे को लेकर तनाव में?

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई। शिवसेना विधायकों की अयोग्यता मामले में उद्धव गुट …

पेशाब कांड आरोपी के करीबी विधायक का टिकट कटा ? महिला सांसद रीता पाठक प्रत्याशी

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट 2023: चुनावी राज्य मध्य प्रदेश में आज भाजपा ने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *