Breaking News

संत्रा उत्पादनात घट, द्राक्ष आगमन लांबणीवर… कारण वाचा

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :
यंदा द्राक्ष हंगाम दोन महिन्यांनी लहरी हवामानामुळे लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे, कडाक्याच्या उन्हामुळे मृग आणि अतिपावसामुळे अंबिया असे संत्र्यांचे दोन्ही बहर झडल्याने यंदा संत्री उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

Advertisements

अतिवृष्टी, खराब हवामान आणि हवामानात वेगाने होत असलेल्या बदलांमुळे यंदा द्राक्षांचा हंगाम महिनाभराने लांबणीवर गेला आहे.

Advertisements

नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसर वगळता राज्यभरात कुठेही पूर्वहंगामी (अगाप) छाटण्या झाललेल्या नाहीत. त्यामुळे पुरेशी गोड द्राक्षे बाजारात येण्यास फेब्रुवारअखेर उजाडणार आहे.

ऑगस्ट महिन्यात इंदापूर, तुळजापूर आणि तासगावच्या पूर्व भागात फळ छाटणी होते. सप्टेंबर अखेपर्यंत राज्यातील सरासरी तीस टक्के द्राक्षबागाची छाटणी झालेली असते. पण, मागील दोन-तीन हंगामांत फटका बसल्यामुळे आणि यंदा पावसाचा जोर कायम असल्यामुळे आजअखेर द्राक्ष बागायतदार छाटणी करण्यास धजावताना दिसत नाहीत. फळ छाटणी झाल्यानंतर चार महिन्यांनंतर द्राक्षे बाजारात येण्यास सुरुवात होते. यंदा ऑगस्ट महिन्यात छाटण्या झाल्या नाहीत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरअखेर बाजारात होणारी द्राक्षांची आवक यंदा होणार नाही. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून राज्यात फळ छाटण्यांना वेग येईल आणि

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नि:शुल्क राशन के साथ फ्री में मिलेगी 10 किलो वाली कैरीबैग? राशन कार्ड धारक नागरिक उठायें लाभ

नि:शुल्क राशन के साथ फ्री में मिलेगी 10 किलो वाली कैरीबैग? राशन कार्ड धारक नागरिक …

PM किसान योजना में अभी तक बैंक में नहीं आए 2 हजार रूपए? तो करे यह काम- तुरंत आ जाएंगे पैसे

PM किसान योजना में अभी तक बैंक में नहीं आए 2 हजार रूपए? तो करे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *