विश्व भारत ऑनलाईन :
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी सोमवारी (२६ सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते.
घटस्थापना कधी?
दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी नवरात्रीच्या घटस्थापना मुहूर्ताबद्दल माहिती दिली आहे. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल.