Breaking News

आता घरीच मिळवा ड्रायव्हिंग लायसन ; ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स अत्यंत आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास MV-Act अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच, जर तुम्ही लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. याच कारणामुळे भारतात दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. तुम्हाला अशा लायसन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये जाण्याचीही गरज नाही.

Advertisements

जसा काळ बदलतोय तसे ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियमही बदलत आहेत. सध्याच्या नियमांनुसार, १६ ते १८ वर्षांपर्यंतच्या व्यक्तिंना लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. परंतु, हा परवाना असलेली व्यक्ति फक्त Without Gear ची गाडी चालवू शकते. तसेच हे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पालकांचीही परवानगी आवश्यक आहे. या लायसन्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्ही घरबसल्याही काढू शकता, यासाठी तुम्हाला फक्त एक चाचणी द्यावी लागेल.

Advertisements

अर्ज कसा करावा?

🏍️जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर, प्रथम भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या वेबसाइटवर जा.

🏍️यानंतर समोर एक बॉक्स येईल, त्यामध्ये तुमचे राज्य सिलेक्ट करा.

🏍️यामध्ये तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यामधील Apply for Learner Licence यावर क्लिक करा.

🏍️तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे याठीकाणी अपलोड करावी लागतील.

🏍️यानंतर तुम्हाला एक ऑनलाइन चाचणी पास करावी लागेल.

🏍️7 दिवसांच्या आत तुम्हाल ड्रायव्हिंग लायसन्स असेल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अयोध्‍येला जाण्‍यासाठी नागपूर?अमरावतीहून विशेष रेल्‍वे

उत्तर प्रदेशातील अयोध्‍या येथे २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्‍तांना रामलल्‍लांचे …

नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा

रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *