Breaking News

मोह आवरेना : अंबाझरी तलावात पोहताना मुलाचा मृत्यू

विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर शहरातील अंबाझरी तलावावर मित्रांसोबत फिरायला आलेल्या १२ वर्षीय मुलाला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्या मुलाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. शौर्य तुकाराम कोहळे (१२, रा. लोखंडेनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. गेल्या १० महिन्यांतील अंबाझरी तलावातील हा बारावा बळी आहे. शौर्य हा शनिवारी दुपारी दोन वाजता वस्तीतील चार मित्रांसह अंबाझरी तलावावर गेला होता.

चौघेही पाण्यात उतरले. शौर्य याला पोहणे येत नव्हते तरी तो खोल पाण्यात गेला. तो बुडायला लागला. त्यामुळे त्याच्या तीनही मित्रांनी आरडाओरड केली. परंतु, त्याला कुणीही मदत केली नाही. माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान अंबाझरी तलावावर पोहचले. त्यांनी शौर्यचा शोध घेतला. परंतु, त्याचा मृतदेह मिळून आला नव्हता. रविवारी सकाळी शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *