Breaking News

अमिताभसोबत माझे संबंध नव्हते… रेखाचे विधान चर्चेत

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यात प्रेम होते, हे सर्वश्रुत आहे. याच प्रश्नावर रेखा एका मुलाखतीत उत्तरल्या, “हो, अर्थातच अमिताभवर प्रेम केले.पण हा तर खूप सोप्पा प्रश्न आहे कारण मला आजपर्यंत असा एखादा पुरुष, महिला किंवा मुलंही नाही भेटलीत ज्यांचं अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम नाही. मग हा प्रश्न मलाच का? मी याला नकार देईन असं वाटतं का?” याच मुलाखतीत स्पष्टीकरण देताना रेखा पुढे म्हणाल्या होत्या, “अमिताभ यांच्यासोबत माझे कोणतेही व्यक्तीगत संबंध किंवा नाते नव्हते आणि हेच सत्य आहे. वाद आणि अफवा यात कोणतंच सत्य नाही.”

Advertisements

बॉलिवूड अभिनेत्री रेखा सौंदर्याच्या बाबतीत आजही आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या रेखा त्याच्या करिअरबरोबरच खासगी आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत राहिल्या होत्या. त्या काळी अभिनेत्री रेखा यांचं नाव सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलं गेलं होतं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा तर बऱ्याच झाल्या होत्या मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दोघांनी नेहमीच टाळलं होतं. पण एका मुलाखतीत रेखा यांना अमिताभ यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी खूपच स्पष्ट उत्तर दिलं होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

बॉलीवुड सितारों ने एक बार नहीं, बल्कि 3-4 बार रचाई शादी

बॉलीवुड सितारों ने एक बार नहीं, बल्कि 3-4 बार रचाई शादी एक उम्दा एक्टर और …

उद्योगपति अनिल अंबानी,अभिनेता अक्षय कुमार, फरहाण अख्तर ने लाइन में लगकर किया मतदान

उद्योगपति अनिल अंबानी ने लाइन में लगकर किया मतदान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *