Breaking News

गदा चोरण्यापूर्वी घेतले हनुमानाचे दर्शन : नागपूरजवळील कन्हानमधील घटना

विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील चंद्रीका बाजाराजवळ प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमानाची पितळेची गदा एक युवक चोरून घेऊन गेल्याने खळबळ माजली आहे. चोरीचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय.

चोरी करण्यापूर्वी त्या युवकाने हनुमानाला नमस्कार केला, तिथे ठेवलेला प्रसादही ग्रहण केला. आणि नंतर आणलेल्या झोळीत गदा घेऊन निघून गेला. दिवसाढवळ्या मंदिरात झालेल्या या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. महिनाभरात मंदिरात झालेली चोरीची ही दुसरी घटना आहे. पहिले मंदिरातील हनुमानाचा मुकुट चोरीला गेला होता. त्या नंतर पाच ते सहा महिन्यांनी परत मुकुट आणि कडे चोरीला गेले. त्या नंतर मंदिरात सीसीटीव्ही लवण्यात आला. सीसीटीव्ही लावल्यानंतर गेली दोन वर्षे चोरी झाली नाही. आणि आता ही घटना घडली. गदेसाेबत उदबत्ती लावायच्या स्टॅण्डचीही चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्हीमुळे जिल्ह्यात मंदिरात चोरीच्या घटनांना चाप बसला असला तरी या घटना पूर्णपणे बंद झालेल्या नाही. देवाचे दागीने, दानपेटी, रोख रक्कमेसह मंदिरातील साहित्याचीही चोरी होते. पोलिसांनी मंदिर चोराचा शोध सुरू केला असून मंदिर व्यवस्थापनाला अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

About विश्व भारत

Check Also

नाबालिका के दुष्कर्मि देहदानवों को पुलिस ने किया गिरफ्तार 

नाबालिका के दुष्कर्मि देहदानवों को पुलिस ने किया गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

कातिल प्रेमी ने वारदात को छुपाने के लिए नहर में गिराई थी कार

कातिल प्रेमी ने वारदात को छुपाने के लिए नहर में गिराई थी कार टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *