विश्व भारत ऑनलाईन :
परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने नागपूर जिल्ह्यात मोठा फटका बसला. सोमवार रात्री पाऊस आला. त्यानंतर मंगळवार सकाळपासून चांगलाच बरसत आहे.काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होत आहे. नागपूर शहर, उमरेड, मौदा, काटोल परिसरातील काही भागात पाऊस कमी-जास्त प्रमाणात आहे.या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.
