Breaking News

भाजप आक्रमक : सहायक निबंधक अखेर निलंबित

विश्व भारत ऑनलाईन :
भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना अखेर निलंबित केले आहे. या आदेशामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या सहायक निबंधक यांच्यावरील कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप
सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी एकवीरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे, पवना कृषक संस्था, काले कॉलनी व मावळ तालुक्यातील विविध विकास सोसायटीबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतदीनुसार कार्यवाही केलेली नाही. तसेच सदर संस्थांवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अनियमित व जाणीवपूर्वक कामकाज केल्याचे निदर्शनास येत आहे, असा ठपका ठेवून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भाजपची काय होती मागणी?

एक महिन्यापूर्वी मावळ तालुका भाजपतर्फे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांचे निलंबन करावे अथवा त्यांची तात्काळ बदली करावी, या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी कारवाई करणे शक्य नसेल, तर त्यांना मावळात येणे बंद करावे, अशी आग्रही भूमिका भाजपा पदाधिकार्‍यांनी घेतली होती. तसेच, माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सहकार मंत्र्याची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. अखेर आज सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

शंभर कोटींची रेती तस्करी : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात प्रकार

जिल्ह्यात वैनगंगेसह इतर नदीपात्रातून बेसुमार रेती तस्करी होत आहे. यातून शासनाचा शंभर कोटी रुपयांचा महसूल …

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *