विश्व भारत ऑनलाईन :
लाखो भाविकांचे सप्तश्रुंगी देवी श्रद्धास्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. श्री सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स आयोजित सप्तश्रुंगी हिल मॅरेथॉन 2022 सहावे पर्व’ रविवारी आयोजित केले आहे.या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्यविषयक जागरूकता अधोरेखित करण्याचा नाशिक रनर्स ग्रुपचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
अशी असेल स्पर्धा?
ही स्पर्धा 21 कि.मी. स्त्री/पुरुष, 10 कि.मी. स्त्री/पुरुष व 5 कि.मी. स्फुर्ती रन स्त्री/पुरुष अशा प्रकारात होणार आहे.ऑफलाइन नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिकमधील सर्व आर्यनमैन उपस्थित राहणार आहेत. मॅरेथॉन यशस्वीतेसाठी सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स, नाशिक यांसह ग्रामपंचायत सप्तश्रुंगी गड व ग्रामपंचायत नांदूरी प्रयत्न करीत आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने नांदुरी ते सप्तश्रृंगी गड ही वाहतूक सेवा सकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध महसूल खात्याचे अधिकारी पोलिस प्रादेशिक परिवहन अधिकारी सहभागी होणार आहेत.