Breaking News

अजित पवार अस्वस्थ, ठाकरेंच्या काळातील मंत्री करायचे रेतीचा काळाबाजार-फडणवीस

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.शिंदेंनी अनेकांना मंत्रिपदाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवले होते. त्यामुळे काही जणांमध्ये अस्वस्था असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोप केला. काही दिवसांतच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार स्थिर आहे. सरकारमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल व पुन्हा निवडून येईल. उलट अजित पवारांमध्येच अस्वस्थता असून ते असे वक्तव्य करीत आहेत.

Advertisements

मंत्र्यांकडूनच रेतीचा काळाबाजार

मविआ सरकारमध्ये मंत्रीच रेतीचा काळाबाजार करीत होते, असा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीस म्हणाले, मविआ सरकारमध्ये ज्या मंत्र्यांनी तसेच इतरांनी रेतीचा काळाबाजार केला, अशा सर्वांना जेलमध्ये टाकणार आहोत. असा भ्रष्टाचार आमच्या सरकारमध्ये चालणार नाही. आम्हाला भ्रष्टाचाऱ्यांकडून एक पैसाही नको. नियमाप्रमाणे सर्व पैसा सामान्यांसाठी सरकारच्या तिजोरीतच गेला पाहिजे. मविआ काळात ज्यांनी हा भ्रष्टाचार केला, त्यांना मी सोडणार नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी होणार मुख्यमंत्री?आमदार अपात्र ठरल्यास काय होणार?

सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर …

भेड़-बकरियां शेर से लड सकती है? CM शिंदे का उद्धव ठाकरे पर पलटवार

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के नेता एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *