Breaking News

गडकरी-फडणवीस-बावनकुळेंना मोठा धक्का : पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ

विश्व भारत ऑनलाईन :
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने पंचायत समितीत जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने ९ जागांवर विजय प्राप्त केला आहे. भाजपला मात्र खातेही उघडता आले नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. राज्य पातळीवरील दोन मोठ्या नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने मोठी चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या काटोल आणि नरखेड या तालुक्यांतील सभापतीपद राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. तसंच हिंगणा तालुक्यातील सभापतीपद निवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एका तालुक्याचं सभापतीपद मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष यशस्वी ठरला आहे. या पक्षाचे रामटेक तालुक्यातील आमदार आशिष जैसवाल यांनी तालुक्यातील सभापतीपद आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे खेचून आणले आहे.

नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ २ तालुक्यांमध्ये उपसभापतीपदावर समाधान मानवं लागलं आहे. पक्षातील दिग्गज नेते ज्या नागपूर जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यात सभापतीपद निवडणुकीत भाजपची दारूण अवस्था झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

About विश्व भारत

Check Also

MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा : उद्धव ठाकरे की डिमांड

मुंबई में MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा, उद्धव ठाकरे की डिमांड? …

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके ? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *