Breaking News

खासगी प्रॅक्टिस केल्यास निलंबित ; तुकाराम मुंढेंचा सरकारी डॉक्टरांना इशारा

विश्व भारत ऑनलाईन :
नेहमी आपल्या कामाने चर्चेत असणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली. तुकाराम मुंढे हे बीडमध्ये आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

खासगी प्रॅक्टिस केली तर थेट निलंबित करणार, असे म्हणत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी हा शेवटचा ईशारा असल्याचे म्हणत मुंढे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला. मुंढे यांच्या या इशाऱ्याने जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचं, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठक सुरू आहे. या दरम्यान मात्र मुंडे यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस करू नये. जर केल्यास डीसमिस करू. असा सज्जड दम देखील यावेळी मुंडे यांनी भरला आहे

काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यातच नवीन पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मुंडे यांनी अचानक रुग्णालयाला भेट देऊन गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऐन दिवाळीत मुंढे मराठवाडा दौरा करत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. विदर्भ दौऱ्यावरही मुंडे येणार असल्याचे समजते.

About विश्व भारत

Check Also

जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या

शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेला २४ एप्रिल पासून सुरुवात झाल्यानंतर बदली पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला …

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *