विश्व भारत ऑनलाईन :
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कुणाला कुठल्या फटाक्याची उपमा द्याल असे विचारले असता ते म्हणाले की, आमचे नेते नरेंद्र मोदी हे रॉकेट आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॉम्ब आहेत. रॉकेट आणि बॉम्ब राज्यात कुणाकडेही नाही ते फक्त भाजपकडे आहेत. बाकी राज्यातल्या इतर पक्षांमध्ये लवंगी फटाके बरेच आहेत. खाकी फटाका कुणाला म्हणाल? या प्रश्नावर त्यांनी शरद पवार असं उत्तर दिलं. तर फुसका बार कुणाला म्हणाल? असं विचारलं असता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं नाव घेतलं. राज ठाकरेंच्या मनसे या पक्षाला त्यांनी फटाक्यांच्या लडीची उपमा दिली. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रावसाहेब दानवे बोलत होते.
