Breaking News

भगवान केदारनाथ गेले तपस्येला : धामचे दरवाजे हिवाळ्यात बंद

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
उत्तराखंड येथील केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे यंदाही बंद करण्यात आले. अकरावे ज्योतिर्लिंग भगवान केदारनाथचे दरवाजे दरवर्षी हिवाळ्यासाठी बंद केले जातात. दरवाजे बंद झाल्यावर भगवान केदारनाथ हिमालयात हिवाळ्यात सहा महिने तपस्या करतात. त्यामुळे हिवाळ्यासाठी भगवान केदारनाथचे दरवाजे आज सकाळी 8.20 च्या सुमारास हिमालयातील या प्रसिद्ध मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.

Advertisements

🌞आज सकाळी साडेआठ वाजता भक्तगण आणि भाविकांच्या जयघोषात भगवान केदारनाथची पालखी मंडपातून मंदिराच्या आवारात आणण्यात आली. मुख्य मंदिराच्या तीन वेळा प्रदक्षिणा केल्यानंतर पालखी मिरवणुकीत उखीमठ येथी ओकारेश्वर मंदिराच्या हिवाळी आसनावर नेण्यात आली.

Advertisements

🌞केदारनाथ धाम हे हिंदू धर्मीयांच्या मान्यतेनुसार चारधाम पैकी एक आहे. आता चारधाम यात्रा सुरू झाल्यानंतर केदारनाथचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा उघडले जाईल. यावर्षी अक्षय्य तृतीयेला 3 मे रोजी चारधाम यात्रा सुरू झाली होती. तर केदारनाथ मंदिराचे दरवाजे 6 मे रोजी उघडण्यात आले होते. आता पुढील वर्षी जेव्हा चार धाम यात्रा सुरू होईल तेव्हा केदारनाथ मंदिराचे दरवाजे पारंपारिक पद्धतीने मंत्रांच्या जपासह उघडले जातील.

🌞दरवाजे बंद करण्यापूर्वी केदारनाथ धामचे गर्भगृह सोन्याने सजवले आहे.एएनआयनेच्या वृत्तानुसार,यापूर्वी २६ ऑक्टोबरला केदारनाथ धामचे गर्भगृह सोन्याने सजवण्यात आले होते. गर्भगृहाच्या भिंती आणि छताला 550 सोन्याच्या थरांनी नवे रूप देण्यात आले. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या सुवर्ण सजावटीचे काम बुधवारी सकाळी पूर्ण झाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड …

मंदिर बना जंग का अखाड़ा: श्रद्धालुओं और पुजारियों के बीच झगड़ा, जमकर चले लाठी डंडे

मंदिर बना जंग का अखाड़ा: श्रद्धालुओं और पुजारियों के बीच झगड़ा, जमकर चले लाठी डंडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *