Breaking News

कुरकुरीत ब्रेड पोट,हृदयासाठी धोकादायक : लहान मुलांनाही धोका

विश्व भारत ऑनलाईन :
कुरकुरीत ब्रेड मस्तपैकी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. स्पंजी आणि कुरकुरीत ब्रेड गरम करून मग त्यावर बटर किंवा तूप- साखर लावून तो खाण्याने अनेकांच्याच वीकेंडची किंवा काहींच्या तर दर दिवसाची सुरुवात होते. सँडविच म्हणू नका किंवा मग ब्रेड पकोडा, यामध्येही हा व्हाईट ब्रेड सर्रास वापरला जातो. काहींसाठी हाच रोजचा डब्बा असतो. पण, नकळत हीच सतत व्हाईट ब्रेड खाण्याची सवय तुमच्या शरीरासाठी मात्र चांगली नाही, हे लक्षात येतय का? या ब्रेडमुळे तुम्हाला अनेक आजारही बळावू शकतात. लहान मुलांच्या आरोग्यावरही ब्रेडमुळे धोका होऊ शकतो.

मीठाचे जास्त प्रमाण

बहुतांश व्हाईट ब्रेड्समध्ये मीठ आणि प्रिझर्वेटीव्हजचे प्रमाण जास्त असते. पुढचे काही दिवस हे पदार्थ टिकून राहावेत यासाठीचाच हा प्रयत्न असतो. पण, शरीरासाठी मात्र हे अजिबातच योग्य नाही. व्हाईट ब्रेडमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सतावतो.

वजन वाढत

व्हाइट ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट, रिफाईंड शुगर आणि मीठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराचे नुकसान होते. रोजच्या रोज ब्रेड खाणाऱ्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढून चरबीही वाढू लागते. यातून मधुमेह, स्थुलता यांसारख्या समस्या भेडसावतात.

हृदयाला धोका

ब्रेडमध्ये असणाऱ्या सोडियममुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सतावतो. त्याशिवाय रक्त धमन्यांमधून हृदयापर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो.ज्यामुळे आर्टरी डिजीज, ट्रिपल वेस्ल डिडीज आणि इतर हृदयरोगांचा धोका बळावतो.

पोटाच्या समस्या

जास्त प्रमाणात ब्रेड खाल्ल्यास पोटाच्या समस्या तयार होतात. गॅसेस होते. त्यातून पोटदुखी आणि अपचन होते.

About विश्व भारत

Check Also

बडी ही चमत्कारी है वनौषधीय काली हल्दी से चोर शत्रु भय का नाश और धनवर्षा का योग

बडी ही चमत्कारी है वनौषधीय काली हल्दी से चोर शत्रु भय का नाश और धनवर्षा …

आंखों से चश्मे के बिना दिखता नहीं! रोशनी बढ़ाने का घरेलू आयुर्वेदिक इलाज

आंखों से चश्मे के बिना दिखता नहीं! रोशनी बढ़ाने का घरेलू आयुर्वेदिक इलाज   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *