विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील मोठे प्रकल्प बाहेर राज्यात जात आहेत. त्यात नागपूरातील एका प्रकल्पाची भर पडली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूकीटत अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवित आहे. मात्र,प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रकल्प परत जात आहेत.
विमान तसेच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती. परंतु, प्रशासकीय विलंबामुळे सुमारे १,१८५ कोटींची प्राथमिक गुंतवणूक असलेला प्रकल्प आता हैदराबादला गेलाय. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसेच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचादेखील समावेश होता. माहितीनुसार, कंपनीने जागेसाठी एमएडीसीशी संपर्कदेखील केला. परंतु, जागेशी संबंधित विलंबामुळे हा प्रकल्प आता हैदराबाद येथे गेला आहे.