विश्व भारत ऑनलाईन :
हृदयक्रिया बंद पडल्यानेच वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा परिक्षेत्रात घडल्याची माहिती समोर आली आहे.वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असतानाच परत एका वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे
नागपूर जिल्ह्यात वाघांची शिकार वा मृत्यूच्या घटना नव्या नाहीत. यापूर्वी २३ मार्च २०२१ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. या वाघाच्या शरीरावरील संपूर्ण केस गळून पडले होते. मात्र, पायाचे चारही पंजे कापले होते. ८ डिसेंबर २०१९ रोजी नागपूरमध्ये बिहाडा खाणीतील खड्ड्यात बुडून वाघाचा मृत्यू झाला होता. रामटेक वन परिक्षेत्रातील मानेगाव परिसरातील बिहाडा खाणीमध्ये पडून पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला होता. पाण्यात पडल्यानंतर फुप्फुसामध्ये पाणी शिरल्याने वाघाचा गुदमरून मृत्यू झाला होता.
प्राथमिक माहितीनुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसनक्रिया बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले आहे.